31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeआंतरराष्ट्रीयडोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली. आपल्याला मंगळवारी अटक केली जाऊ शकते, असे सांगत आपल्या समर्थकांना याचा विरोध करण्यास सांगितले आहे. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नीच्या कार्यालयाकडून त्यांना अटक होऊ शकते. मात्र, काय आरोप असतील हे त्यांनी सांगितले नाही. अ‍ॅटर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्याने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

न्यूयॉर्कच्या काही सरकारी संस्था महिलांना दिलेल्या पैशांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणी त्यांना अटक होऊ शकते. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांना शारीरिक संबंधांच्या बदल्यात पैसे देऊन हे प्रकरण सार्वजनिक करू नका, असे सांगितले होते, असा आरोप आहे. ट्रम्प यांनी शनिवारी पहाटे त्यांच्या सोशल नेटवर्कवर एका पोस्टमध्ये सांगितले की, मॅनहॅटन अ‍ॅटर्नी कार्यालयातून बेकायदेशीरपणे लीक झालेल्या एका गुप्त माहितीनुसार त्यांना पुढील आठवड्यात मंगळवारी अटक होण्याची शक्यता आहे.

स्टॉर्मी प्रकरणाची चौकशी
हे प्रकरण पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलशी संबंधित आहे. तिचे खरे नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे. तिचे म्हणणे आहे की, तिचे ट्रम्प यांच्यासोबत १० वर्षांपूर्वी अफेअर होते. मात्र ट्रम्प यांनी असे काही नसल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी स्टॉर्मीला तिचे आणि त्यांचे लैंगिक संबंधांबद्दल मौन बाळगण्यासाठी १.३० लाख डॉलर्स दिले होते, असा आरोप आहे. याच प्रकरणी आता चौकशी केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या