35.2 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयडोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय : अमेरिका आणि चीनमधील विमानसेवा बंद

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय : अमेरिका आणि चीनमधील विमानसेवा बंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: चीन आणि अमेरिकेमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरुन येणाऱ्या प्रवाशी विमानांवर बंदी घातली आहे. यामुळं 16 जूनपासून चीन आणि अमेरिका या दोन देशांमधील विमान सेवा बंद होणार आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीवरुन या दोन देशांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मागील काही दिवसांपासून चीनसोबत अमेरिकेने अनेक आर्थिक व्यवहार देखील तोडले आहेत.

चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला. सध्या कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. जगभरातील जवळपास सर्वच देश या जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. परंतु, सध्या इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत या व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सतत दावा करत आहेत की, कोरोना हा एक मानवनिर्मित व्हायरस आहे आणि याची उत्पत्ती चीनमधील एका प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.

Read More  देशात १५ दिवसांत दोन मोठी चक्रीवादळे!

कोरोना महामारीवरुन ट्रम्प यांनी चीनवर अनेकदा निशाणा साधला आहे. अनेकदा त्यांनी कोरोना व्हायरसचा उल्लेख ‘चायनीज व्हायरस’ असा देखील केला आहे. त्यांनी चीनवर आरोप देखील केला आहे की, चीनने या व्हायरसबाबत जगाला माहिती देण्यास उशीर केला. राष्ट्रपती ट्रम्प यांनी अमेरिकेत चीनी विद्यार्थी आणि शोधार्थ्यांच्या प्रवेशावर देखील बंदी घातली आहे. त्यांनी चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मी सोबत संबंध ठेवणाऱ्या विद्यार्थी आणि शोधकर्त्यांना देशात येण्याला आणि शिक्षा ग्रहण करण्याला बंदी घातली आहे.

अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांनी सांगितले होते की, कोरोना व्हायरस चीनच्या कपटीपणाचं फळ आहे. पॉम्पियो पुढे म्हणाले की, आमच्याकडे हा व्हायरस वुहानमधूनच आला असल्याचे सबळ पुरावेदेखील आहेत. ‘चीनकडे कोरोना थांबवण्याची संधी होती, परंतु त्यांनी मुद्दाम असं केलं नाही.’, असं देखील ते म्हणाले होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या