34.2 C
Latur
Thursday, June 1, 2023
Homeपॅकेज जाहीर करू नका, असं नरेंद्र मोदींनीच सांगितलं- उद्धव ठाकरे

पॅकेज जाहीर करू नका, असं नरेंद्र मोदींनीच सांगितलं- उद्धव ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई | राज्य सरकारनं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाकडून केली जात आहे. पॅकेज जाहीर करण्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

राज्यांना पॅकेज जाहीर न करण्याचं आवाहन
देशात लॉकडाउन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पाच वेळा बैठका घेतल्या. मागील बैठकीत त्यांनी सर्व राज्यांना पॅकेज जाहीर न करण्याचं आवाहन केलं असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

राज्याची स्थिती सध्या चांगली नाही
पंतप्रधानांनी सांगितलं होतं की. केंद्राची आणि राज्याची स्थिती सध्या चांगली नाही. पुढील परिस्थितीचा आताच अंदाज येऊ शकत नाही. त्यामुळे गोंडस वाटणाऱ्या घोषणा करू नका असं ते म्हणाले होते. त्यामुळे राज्य सरकार प्रत्यक्ष मदत करत आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Read More  मित्रमंडळींना भेटा, फिरायला जा म्हणजे मनातील भीती दूर होईल -प्रकाश आंबेडकर

 मुंबईतील रुग्णांची संख्या शिखरावर
दरम्यान, पुढील 10-15 दिवस काळजीचे आहेत. राज्यातील आणि मुंबईतील रुग्णांची संख्या शिखरावर असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या