25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रभाजप आणि मनसेची युती झाली तर आश्चर्य वाटायला नको

भाजप आणि मनसेची युती झाली तर आश्चर्य वाटायला नको

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सध्या अनाकलनीय घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांची युती झाली तर त्यात आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे. जळगाव जिल्हा दूध संघावरील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही टीका केली आहे.

महानुभाव पंथाच्या संमेलनानिमित्त आमदार एकनाथ खडसे नाशिकमध्ये आले होते. जळगाव दूध संघावर राज्य सरकारने बेकायदेशीर प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. चुकीच्या व खोट्या पद्धतीने चौकशी केली जात आहे. त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. तसेच न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने राज्य सरकारने प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द ठरवल्याने न्याय मिळाल्याचा दावाही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थ असून, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी त्यांना निमंत्रण दिले, यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, पंकजा यांनी स्वत: निर्णय घ्यायचा आहे. इतक्या वर्षांपासून पक्षात काम करत असल्याने त्या असा निर्णय घेतील, असे वाटत नाही, असेही खडसे पुढे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या