26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमनात येईल त्या घोषणा करत सुटू नका; अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी झापले

मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका; अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी झापले

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदे गटातील मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत, प्रसिद्धीसाठी परस्पर नवनव्या घोषणा करणा-या मंत्र्यांना फडणवीसांनी तंबी दिल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर ४२ दिवसांनी मंत्रिपदाचा विस्तार झाला. अजून दुसरा टप्पा पार पडायचा आहे. अशातच मंत्रिपद मिळाल्यानंतर काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी घोषणांचा सपाटाच लावला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान, कोणताही सारासार विचार न करता घोषणा करू नका. कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका. मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका. असे खडेबोल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह इतर मंत्र्यांना सुनावले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समज दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्राच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेप्रमाणे राज्यातही नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्रातील योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ट करून शेतक-यांना मदत योजना सुरू करण्यासंदर्भात विचारमंथन सुरू होते. दरम्यान, यासंदर्भातील बातमी प्रसारमाध्यमांमध्ये लीक झाली.

ही बाब फडणवीसांना समजली असता त्यावरून मंत्रिमंडळ बैठकीतच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरले आणि ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला. अजून कोणताही निर्णय झाला नसताना ही माहिती तुम्ही जाहीर कशी केली? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला असल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर मी विचार सुरू आहे असे म्हणालो, असे उत्तर सत्तार यांनी फडणवीसांना दिले. मात्र, या सर्वावर फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या