27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रविघ्नहर्त्या, जिवाभावाची माणसं तुटू देऊ नकोस; धनंजय मुंडेंची गणरायाला प्रार्थना

विघ्नहर्त्या, जिवाभावाची माणसं तुटू देऊ नकोस; धनंजय मुंडेंची गणरायाला प्रार्थना

एकमत ऑनलाईन

बीड : कोरोनाचे संकट जसे दूर झाले, तसे महाराष्ट्रावरचे, शेतक-यांवरचे नैसर्गिक संकटही दूर कर. कोरोना काळात जशी जिवाभावाची माणसं हिरावली गेली, ती दूर होऊ देऊ नकोस, अशी प्रार्थना बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी गणरायाच्या चरणी केली आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे.

मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनी आपापल्या घरात गणेशोत्सव साजरा केला. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या घरीदेखील गणपतीची स्थापना झाली. त्यानंतर त्यांनी नाथ प्रतिष्ठानद्वारा आयोजित वैजनाथ सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची स्थापना पत्नी राजश्री मुंडे यांच्यासह केली आहे.

यंदा नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या