34.2 C
Latur
Thursday, June 1, 2023
Homeराष्ट्रीयकामागारांचे पगार न देणाऱ्या कंपन्यांवर 12 जूनपर्यंत कारवाई करू नका- सुप्रीम कोर्ट

कामागारांचे पगार न देणाऱ्या कंपन्यांवर 12 जूनपर्यंत कारवाई करू नका- सुप्रीम कोर्ट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, 05 जून : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं 70 दिवस लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यादरम्यान अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले. अनेक कंपन्यांची काम रडखली. काही कंपन्यांनी पगारात कपात केली तर काही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे पगारही देण्यात आले नाही. अशा कंपन्यांविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणालाही कामावरून काढू नये आणि पगारात कपात करू नये असं आवाहन केलं असतानाही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं किंवा पगार दिले नाहीत. अशा कंपन्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. लॉकडाऊन दरम्यान कामगारांचे पगार ज्या कंपन्यांनी दिले नसतील त्यांच्याविरुद्ध येत्या 12 जूनपर्यंत कारवाई करू नये असे निर्देश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत.

Read More  मुसळधार पावसात मोठा अपघात : 9 जणांचा जागीच मृत्यू

लॉकडाऊ दरम्यान कामावरून कामगारांचे पगार कमी करू नयेत अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले असतानाच सुप्रीम कोर्टानं 12 जूनपर्यंत कारवाई करू नयेत असे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या