24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रदानवे-खैरे यांचे डोके काम करेना ; भुमरेंची जहरी टीका

दानवे-खैरे यांचे डोके काम करेना ; भुमरेंची जहरी टीका

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता विकोपाला जाऊन पोहोचला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे दौरा करतात तिथे शिवसेना-राष्ट्रवादीकडून त्या जागेच शुद्धीकरण केले जात आहे. दरम्यान यावर बोलतांना रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचे डोके काम करत नसून, त्यांचे डोके गोमुत्राने धुतले पाहिजे असे वक्तव्य भुमरे यांनी केले आहे.

दरम्यान भुमरे म्हणाले, माझ्या जावयावर आणि माझ्यावर ज्या कामामुळे आरोप करण्यात येत आहे त्याचे कागदपत्र अंबादास दानवे यांना राष्ट्रवादीच्या लोकांनी पुरवले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार खुद्द औरंगाबाद मध्ये होते. मात्र राष्ट्रवादीच्या लोकांनी आरोपाचे कागदपत्र त्यांना न देता दानवेंना दिले. कारण त्यांना सुद्धा माहितीय दानवे आणि खैरेंच डोके काम करत नाहीये, असा टोलाही भुमरे यांनी लगावला.

गेल्या महिन्याभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा औरंगाबादचा दौरा केलाय. पहिल्या दौ-यात त्यांनी पैठण येथे सभा घेतली. मात्र याचवेळी ज्या बिडकीन गावात मुख्यमंत्री शिंदेंनी रॅली काढली तिथेच शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्ता शुद्ध केला. यावरच बोलताना भुमरे यांनी अंबादास दानवे आणि खैरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोध करणे विरोधकांचे कामच आहे. मात्र अशा प्रकारे विरोधकांनी गोमूत्र शिंपडने योग्य नाही. एकनाथ शिंदे यांची पैठणला झालेल्या सभेमुळे, दानवे आणि खैरेंच डोके चालत नाही. तर या दोघांचे डोके काम करत नसून, त्याला गोमूत्राने शुद्ध केले पाहिजे अशी टीका भुमरे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे ही त्याच रस्त्याने आले….
पुढे बोलताना भुमरे म्हणाले की, एकनाथ शिंदे ज्या रस्त्यावरून आले त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडून विरोधकांनी रस्ता शुद्ध केला. मात्र त्याच रस्त्यावरून आदित्य ठाकरे सुद्धा आले होते. बहुतेक त्यामुळेच शिवसैनिकांनी रस्ता शुद्ध केला असावा असा खोचक टोलाही भुमरे यांनी लगावला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या