27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रदूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक विश्वास मेहेंदळे यांचे निधन

दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक विश्वास मेहेंदळे यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन झाले आहे. माध्यमतज्ज्ञ, अभिनेते, लेखक अशी ओळख असलेले विश्वास मेहेंदळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील मुलुंड पूर्व येथे विश्वास मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. १० जुलै १९३९ रोजी विश्वास मेंहदळे यांचा जन्म झाला होता.

दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी बातम्या वाचणारे विश्वास मेहेंदळे हे पहिले निवेदक होते. त्यानंतर मुंबई दूरदर्शनचेही ते पहिले वृत्तनिवेदक होते. विश्वास मेहेंदळे यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याची धुराही त्यांनी सांभाळली आहे. १८ हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. याशिवाय अनेक नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत. विश्वास मेहेंदळे सिम्बोयसीस इ्िस्टट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संस्थापक आहेत.

डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी लिहिलेली तसेच संपादित केलेली पुस्तके.
आपले पंतप्रधान,आपले वैज्ञानिक,ओली-सुकी,इंदिरा गांधी व लीला गांधी,केसरीकारांच्या पाच पिढ्या,गांधी ते पटेल,तुझी माझी जोडी,नरम-गरम (कथासंग्रह),नाट्यद्वयी,पंडितजी ते अटलजी,भटाचा पोर (वैचारिक)
मला भेटलेली माणसं,मला माहीत असलेले शरद पवार (संपादित ग्रंथ),मीडिया,यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण,यशवंतराव ते अशोकराव,यशवंतराव ते विलासराव,राष्ट्रपती,सरसंघचालक,​​​​​​​बहुआयामी व्यक्तिमत्त्व.
विश्वास मेहेंदळे यांनी लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखांवर संशोधनात्मक प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली आहे. विश्वास मेहेंदळे यांनी सातारा येथून प्रकाशित होणा-या ‘ऐक्य’ दैनिकाचे संपादक म्हणूनही काम केले आहे.

विश्वास मेंहदळे यांना मीडिया एक्सपर्ट म्हणूनही ओळखले जाते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याशिवाय पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये विश्वास मेहेंदळे यांनी काही काळ नोकरी केली. विश्वास मेहेंदळे हे मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार होते. ‘मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रमही विश्वास मेहेंदळे सादर करत. हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता.

या पुरस्कारांनी गौरव
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेच्या पुणे शाखेकडून ‘मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलाकार’ या पुरस्काराने विश्वास मेहंदळे यांचा सन्मान करण्यात आला आहे. २५ मे २०१७ रोजी विश्वास मेंहदळे यांना हा पुरस्कार मिळाला. याशिवाय सृजन फाऊंडेशनने महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुण्यात २०१० मध्ये भरवलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद डॉ.विश्वास मेहेंदळे यांनी भुषवले आहे.

विश्वास मेहेंदळे यांची भूमिका असलेली नाटके
अग्निदिव्य (अप्पा), एकच प्याला, एक तमाशा अच्छा खासा (प्रधान), खून पहावा करून, जर असं घडलं तर (इन्स्पेक्टर), नांदा सौख्यभरे, पंडित आता तरी शहाणे व्हा (पंडित), प्रेमा तुझा रंग कसा (प्रो. बल्लाळ), भावबंधन, मगरूर (अण्णा), मृत्युंजय (शकुनी), लग्न (भाई), शारदा, सासूबाईंचं असंच असतं (सहस्रबुद्धे), स्पर्श (अप्पा), स्वरसम्राज्ञी (भैय्यासाब).

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या