मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची गेल्या नऊ तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. दरम्यान, परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याच्या चर्च सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जर परब यांना अटक झाली तर, शिवसेनेला दुहेरी झटका बसू शकतो.
दरम्यान काही दिवासांपूर्वी अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली होती. यानंतर ते शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे आपण चौकसीसाठी ईडी कार्यालयात जाऊ शकलो नव्हतो असे परब यांनी सांगितले होते.