20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeपरभणीडॉ. सालेहा कौसरसह लॅब टेक्निशीयनला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षेचा निर्णय कायम

डॉ. सालेहा कौसरसह लॅब टेक्निशीयनला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षेचा निर्णय कायम

एकमत ऑनलाईन

परभणी : अनधिकृतरीत्या पॅथालॉजी लॅब चालवल्याप्रकरणी शहरातील डॉ. सालेहा कौसर आणि लॅब टेक्निशियन यांना २०१६ मध्ये सुनावण्यात आलेली सहा महिने सक्त मजुरी व दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात येत असल्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश एसÞपीÞ पिंगळे यांनी गुरूवार दि. १७ नोव्हेंबर रोजी दिला आहे.

तत्कालीन पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये दि. २९ ऑक्टोबर २०१० रोजी शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनाधिकृत पॅथॅलॉजी लॅब चालवत असल्याबाबत डॉ. Þसालेहा कौसर, कौसर हॉस्पीटल परभणी व लॅब टेक्निशीयन मोहम्मद इम्रान गांधी यांच्या विरूध्द महाराष्ट्र राज्य वैद्यक व्यवसाय अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात साक्षी पुराव्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी, परभणी यांनी दि. २० सप्टेंबर २०१६ रोजी दोन्ही आरोपींना सहा महिने सक्त मजुरी व प्रत्येकी ५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होतीÞ. या शिक्षेविरूध्द आरोपींनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.

या प्रकरणातील सुनावणी दरम्यान आरोपीतर्फे युक्तीवाद करण्यात आला की, डॉ. सालेहा कौसर एमÞबीÞबीÞएसÞ असल्यामुळे महाराष्ट्र राज्य वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ कलम ३३ नुसार त्यांनी महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलकडे नोंदणी केलेली आहे. त्यामुळे त्या दोषी नाहीतÞ सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. आशिष दळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय तसेच गुजरात उच्च न्यायालय यांचा असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट ऑफ भावनगर विÞ. सेक्रेटरी हेल्थ डिपार्टमेंटचा दि. १७ सप्टेंबर २०१० रोजीच्या न्याय निर्णयाचा दाखला दिला. तसेच युक्तीवाद केला की, महाराष्ट्र मेडीकल कॉन्सील व इंडीयन मेडीकल कॉन्सील यांनी ठरवून दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसारच वैद्यकीय व्यवसायाची नोंदणी होते व वैद्यकीय व्यावसायिक ज्या शाखेचा निष्णात आहे त्याच शाखेत व्यवसाय करू शकतोÞ दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर माÞजिल्हा व सत्र न्यायाधिश एसÞपीÞ पिंगळे यांनी डॉ. सालेहा कौसर यांचे शैक्षणिक पात्रता एमÞबीÞबीÞएसÞ असल्यामुळे त्या त्याच क्षेत्रात व्यवसाय करू शकतातÞ तसेच पॅथालॉजी रिपोर्टवर सही करण्याचा अधिकार केवळ जो व्यक्ती एमÞबीÞबीÞएसÞ, एमÞडीÞइन पॅथालॉजी अशी शैक्षणिक पात्रता धारणा करणा-या व्यक्तीस आहेÞ. त्यामुळे लॅब टेक्नीशीयन डीÞएमÞएलÞटीÞअशी पात्रता धारण करणारा आरोपी मोहम्मद इम्रान गांधी यांनी पॅथालॉजी रिेपोर्टवर सही करणे चुकीचे व बेकायदेशीर आहेÞ तसेच डॉÞसालेहा कौसर यांनी कौसर हॉस्पीटल, परभणी येथे डीÞएमÞएलÞटीÞ व्यक्तीस नेमणुकीस ठेवून पॅथालॉजी चालवणे गुन्हा असल्याचे सांगितलेÞ तसेच जिल्हा व सत्र न्यायाधिश एसÞपीÞ पिंगळे यांनी डॉ. सालेहा कौसर व लॅब टेक्नीशीयन मोहम्मद इम्रान गांधी या दोन्ही आरोपींची सहा महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल दिला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.आशिष दळे यांनी काम पाहिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या