30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home उस्मानाबाद 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

एकमत ऑनलाईन

कळंब : ‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा हे यु.ए.ई. देशातील पहिले डॉक्टर ठरले आहेत. सर्वात माहागडा उपचार या उपचारासाठी पंधरा कोटी रुपये खर्च येतो. आपणा सर्वांमध्ये एस.एम.एन. नावाचे प्रथिन (प्रोटीन) मज्जातंतू च्या कार्यासाठी आवश्यक असते. यामुळे आपले मेंदू शरीरातील स्नायूंच्या संपर्कात राहू शकतो.

परंतु या आजारग्रस्त मुलांमध्ये एस.एम.एन. नावाचे जनूक चे उत्परिवर्तन झाल्याने प्रथिन तयार होत नाही.यामुळे शरीरातील स्नायू सामान्यपणे कार्य करत नाहीत व ही मुले अत्यंत कमकूवत असतात. या आजाराच्या सर्वात तीव्र “टाइप १” या प्रकारात मुले कधीही बसूपण शकत नाहीत.तसेच ही मुले वयाच्या दोन वर्षापर्यंत जेमतेम जगतात.

दरम्यान साल सन.२०२० मध्ये वैद्यकीय शास्त्रज्ञांना या आजाराच्या उपचारामध्ये क्रांती आणण्यात यश आलेआहे. या आजारग्रस्त मुलांना जीन थेरपी द्वारे सामान्य व कार्यरत असलेले जनूक इंजेक्शन मधून रक्तात दिल्यास तयार होत नसलेले एस.एम.एन. प्रथिन सामान्यतः तयार होत असल्याचे दिसून आले आहे.जी मुले बसूही शकत नाहीत,ती चालू शकत असल्याचे पाहण्यात आले आहे.तसेच या उपचारानंतर मुलामध्ये त्यांचे स्नायू बळकट होऊन अधिक चांगल्या प्रकारे कार्य करत असल्यचे पाहण्यात आले आहे.

अमेरिका,युरोप,जपान मध्ये हे उपचार तिथल्या सरकारने मान्यता दिल्याने उपलब्ध आहेत. परंतू या उपचाराची किंमत जवळ जवळ ₹१५ कोटी असल्याने कित्येक पालकांना हे परवडत नाही. नोव्हार्टीस- या औषध कंपनी ने ई.स.२०२० मध्ये जगभरात या औषधोपचाराची शंभर मोफत डोसची मॅप नावाची योजना घोषणा केली आहे. ज्या देशात हे उपचार उपलब्ध नाहीत, अश्या देशातील एस.एम.ए. या रुग्णांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब.येथील डॉ विवेक बद्रिनारायण मुंदडा हे बालमेंदूरोगतज्ञ् म्हणून मेडकेयर वूमन अँड चिल्ड्रेन,दुबई येथे कार्यरत आहेत. त्यांच्या देखरेखीखालील दोन एस.एम.ए. रुग्णांना या अभिनव जीन थेरपी चा नुकताच लाभ मिळाला आहे.गुरुवारी (ता.बारा) या दोन्ही बालकांना ही जीन थेरपी देण्यात आली. या यशानंतर या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे यु ए ई देशातील पहिले डॉक्टर ठरले असून हे दोन्ही रुग्ण मॅप या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेणारे सम्पूर्ण आखाती देशामध्ये पहिले वहिले रुग्ण ठरले आहेत.

दिल्ली,गुजरात, गोवा व राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या