21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रद्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल

द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल

एकमत ऑनलाईन

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून दिमाखदार स्वागत
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मुंबईत दाखल झाल्या आहेत. द्रोपदी मुर्मू यांच्या स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पोहोचले. पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं. त्या मुंबईत काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेणार आहेत. तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेने या निवडणुकीत मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे.

भाजप प्रदेश चंद्रकांत पाटील, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नारायण राणे असे अनेक बडे भाजपचे नेते मुर्मू यांच्या स्वागताला उपस्थित होते. काही दिवसातच देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहे. सध्या तरी मुर्मू यांचे पारड जड दिसतेय. तर यशवंत सिन्हा यांच्यासाठीही विरोधकांकडून जोर लावण्यात येत आहे. मात्र देशाचे पुढचे राष्ट्रपती कोण? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

उध्दव ठाकरेंना निमंत्रण नाही
मुर्मू यांच्या खासदार आणि आमदारांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गटाला निमंत्रण देण्यात आलेले नाही. शिवसेना खासदारांच्या दबावामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

मुर्मू यांची स्थिती अधिक मजबूत
अशा स्थितीत मुर्मू यांच्या सभेचे निमंत्रण न मिळणे हा उद्धव गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी या बैठकीला बोलावले नसल्याची पुष्टी केली आहे.

मुर्मू यांच्या सभेत भाजप खासदार आणि आमदारांव्यतिरिक्त शिवसेनेविरोधात बंड केलेले शिंदे गटातील खासदार आणि आमदार सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात भाजप शिंदे गट आणि उद्योग संघाच्या खासदार आणि आमदारांची मते मिळाल्याने मुर्मू या विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा अधिक मजबूत स्थितीत असतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या