23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयद्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चितl ;संसद भवनात मतगणना सुरू

द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चितl ;संसद भवनात मतगणना सुरू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आज देशाला १५ वे राष्ट्रपती मिळणार आहेत. १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज २१ जुलै रोजी सकाळी ११ पासून संसद भवनात मतगणना सुरू झाली आहे. एनडीएकडून राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जर मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.

विशेष म्हणजे १५ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २१ जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रूपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. २१ जुलै २००७ रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी २५ जुलै २००७ रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या.

२००७ ते २०१२ या कालावधीत त्यांनी देशाचे सर्वोच्च पद भूषवले. आता द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्या विजयी झाल्या तर त्या दुस-या महिला राष्ट्रपती होतील. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २४ जुलै रोजी समाप्त होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या