22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeक्रीडाद्रविड असणार टीम इंडियाचा नवीन कोच?

द्रविड असणार टीम इंडियाचा नवीन कोच?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रवि शास्त्री यांनी टी-२० विश्वचषकानंतर राजीनामा देणार असल्याचं सांगितल्याने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची खुर्ची रिकामी होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक कोण असणार? असा प्रश्न खेळाडंूसह अनेकांना पडला होता. मात्र त्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड असणार आहे. राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बॅट्समननंतर आता लवकरच राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावताना दिसणार आहे.

मुख्य प्रशिक्षकासोबतच बॅटिंग प्रशिक्षक आणि बॉलिंग कोच देखील बदलण्यात येणार आहेत. बॅटिंग प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर बॉलिंग प्रशिक्षक म्हणून पारस महाम्ब्रे यांच्या नावाची चर्चा आहे.

यापूर्वी राहुलला दोनदा प्रशिक्षकपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्याने ती नाकारली होती. खेळाडूंना प्रशिक्षण देण्याऐवजी अकादमीमधून नवीन खेळांडूना तयार करण्यात जास्त आनंद वाटतो, असे सांगत त्याने ही ऑफर नाकारली होती. परंतु सौरव गांगुली आणि जय शहा यांच्या सांगण्यावरून त्याने आता ही ऑफर स्वीकारली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या