मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी आपल्या कथेने सर्वांनाच थक्क केलं आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘दृश्यम २’ होय.
या थ्रिलर चित्रपटाने सर्वांनाच अक्षरश: खिळवून ठेवलं होतं. अजय देवगण, श्रिया सरण, तब्बू, इशिता दत्ता स्टारर हा चित्रपट पडद्यावर सुपरहिट ठरला होता. या यशांनंतर निर्मते आता चित्रपटाचा सिक्वेलघेऊन भेटीला येत आहेत. नुकतंच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
येत्या १८ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित, या चित्रपटात अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.