23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रकसारा घाटात  ट्रक पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

कसारा घाटात  ट्रक पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नाशिक : नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंट जवळ पहाटेच्या वेळेस मोठा अपघात झाला आहे. केळ्याने भरलेल्या ट्रकने आयशरला मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक पलटी झाला असून ट्रक खाली पडल्याने चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

या अपघातानंतर ट्रक मधील केळ्यांचे ट्रे महामार्गावर अस्ताव्यस्त पडले होते. पप्पू यादव असे मयत ट्रक चालकाचे नाव असून आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ट्रकचालकाचा मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.
अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाल्यााचेपाहायला मिळाले.

सध्या अपघाती ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. कसारा घाटात झालेल्या या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघात झालेल्या ठिकाणावरून एकाच लेनमधून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. तर मागून येणा-या वाहनांचा खोळंबा होऊन मोठी कोंडी झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या