नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी ब्रिक्सच्या बैठकीत सहभागी झाले होते. चीनने आयोजित केलेली ही बैठक व्हर्चुअल माध्यमात पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा आणि ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो उपस्थित होते.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या भू-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकटातही आर्थिक विकासाला गती प्राप्त झाल्याचे सांगितले.