26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home औरंगाबाद औरंगाबादेत ड्रग्ज साठा जप्त ; दोघांच्या मुसक्या आवळल्या

औरंगाबादेत ड्रग्ज साठा जप्त ; दोघांच्या मुसक्या आवळल्या

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू आणि बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अंमलीविरोधी पथकाकडून चौकशीचे सत्र सुरूच आहे.

या चौकशीमुळे बॉलिवूडमधील ड्रग्ज घेणा-या सेलिब्रिटींची झोप उडाली आहे. त्यात औरंगाबाद पोलिसांनी मोठी कारवाई करीत शहरातील पंचवटी चौकात चरस आणि एमडी (मॅफो ड्रोन) ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद, असिक अली मुसा कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

एमडी ड्रग्ज आणि चरस एका चारचाकी वाहनातून जप्त केला साठा

मुंबईहून औरंगाबादेत आणलेला एमडी ड्रग्ज आणि चरस एका चारचाकी वाहनातून वेदांतनगर पोलिसांनी मंगळवारी पंचवटी चौकातून जप्त केला. ड्रग्ज साठा शहरात विक्रीसाठी आणण्यात आला असावा, असा संशय पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी व्यक्त केला.

मंगळवारी सकाळी स्कॉर्पिओ वाहनातून अंमली पदार्थ आणले जात असल्याची माहिती पोलिसांना खब-याकडून मिळाली. त्यावेळी पोलिसांनी पंचवटी चौकात सापळा रचून ते चारचाकी वाहन थांबवले.

त्या गाडीची झडती घेतली असता त्यात एमडी नावाच्या ड्रग्सच्या १३ पुड्या व चरस या अंमली पदार्थाच्या २५ पुड्या आढळून आल्या. बाजारात या ड्रग्सची किंमत एक कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींसह एक वाहन पोलिसांनी जप्त केले. वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी दिली.

उद्ध्वस्त धर्मशाळा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या