औसा : संजय सगरे
गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचे संकट डोक्यावर घेऊन औसा शहरासह तालुक्यातील ४२ हजार कुटूंबांस घरपोच गॅस पुरवठा करण्याचे सेवाकार्य येथील शहीद चंद्रकांत इण्डेन गॅस एजन्सीजने केलेले आहे. त्यामुळे याचा आदर्श इतर गॅस वितरक युनिटसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
कोरोनाचे भित्तीदायक संकट टाळण्यासाठी लोकांपासून दूर राहणे हाच एकमेव मार्ग आहे. लोकांनी घरीच थांबावे असे सर्व जग सांगत असताना अत्यावश्यक सेवेत गणना होणारी घरगुती गॅस सुविधा ही महत्त्वाची आहे. गॅस उपलब्ध नसेल तर काहीही होऊ शकत नाही. लॉकडाऊन व कोरोनाचे संकटात गॅस सुविधा घरपोच चालू ठेवणे हे खुप मोठे आवाहन वितरकासमोर होते. कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असणा-यां पुण्यासारख्या रेड झोन जिल्ह्यातून गॅसचे रिफीलिंग पार्इंट आहेत. येथून दररोज सिलेंडर भरलेली गाडी घेऊन येणे,ती नंतर निर्जंतुक करुन गोडावून मध्ये उतरावून घेणे. गाडी चालकाला विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था वितरण केंद्राच्या बाजूस केलेली असायची.
शहीद चंद्रकांत इण्डेन या वितरकाकडे औसा शहर व तालुक्यातील १०८ गावांमधील ३६ हजार जोडणी आहेत.शिवाय उज्जवला गॅस योजनेतून १२ हजार ८४ गॅस जोडणी आहेत साधारणपणे ४८ हजार कुटूंबांतील गॅस पुरवठा करण्याचे मोठे आव्हान या वितरकासमोर होते.परंतू आपले ८ कार्यालयीन सहकारी व २६ द्वारपोहचक, १० वाहन चालक या सर्वांच्या सहकार्याने घरपोच गॅस सेवेचे मोठे आव्हान सक्षमपणे सांभाळण्याचे काम करीत आहोत़
कोरोना पार्श्वभुमीवर योध्दयांप्रमाणे सेवा
औसा तालुक्यात उज्जवला गॅस योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत . या सर्व लाभार्थ्यास तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी शासन स्तरावरुन येणाºयां वेगवेगळ्या सूचना या सर्वाची आंमलबजावणी करण्यात वितरकापुढे मोठ्या अडचणी होत्या.परंतू शहीद चंद्रकांत इण्डेन गॅस वितरण कंपनीचे व्यवस्थापक चेतन जाधव यांनी लॉकडाऊन काळात उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थीसह ४२ हजार कुटुंबास घरपोच गॅस सिलेंडर देऊन कोरोना योध्दयाप्रमाणे कार्य केलेले आहे अन् करीतही आहेत़
स्वत:हाबरोबर ग्राहकांची काळजी घेवुन गॅसची सेवा़
कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात सापडल्यानंतर अनेक गावांनी आपले रस्ते बंद केले व गावात प्रवेशापासून मज्जाव करण्यात आला. शहरातही अशीच परिस्थिती होती.परंतु या सर्व अडाचणीवर मात करीत घरपोच सिलेंडर सेवा चालू ठेवली. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर्स, नर्स, पोलिस, यांनी केलेल्या सेवेचे कौतुक करणे कर्तृव्यच आहे.परंतु या काळात जीव मुठीत घेऊन ग्राहकांना घरपोच सेवा देणारा वितरक व त्यांचे गॅस डिलीव्हरी चे काम मात्र कौतुकापासून वंचित राहिले आहेत.औसा येथील वितरक एजन्सीने मात्र आपल्या ४६ कर्मचाºयांना या काळात वैद्यकीय सेवा, व सुरक्षा विषयक उपाययोजना करुन दिल्या जात आहेत .सर्व कर्मचाºयांना व्यवस्थापक चेतन जाधव यांनी पीपीई किट, मास्कशिल्ड , सॅनिटायझर दिले आहेत.स्वखर्चाने ५० पीपीई किट, व २०० मास्कचे वाटप चेतन जाधव यांनी केलेले आहे. प्रत्येक सिलेंडर देताना व घेताना सॅनिटायझिंग करुन घेतले जाते व स्वत:सोबतच ग्राहकांचे आयुष्याची काळजी घेतली जाते.शहीद चंद्रकांत इण्डेन गॅस एजन्सीच्या या सेवावृतीचे ग्राहकांकडून कौतुक केले जात आहे.