27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रदसरा मेळाव्याही ‘हायजॅक’

दसरा मेळाव्याही ‘हायजॅक’

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतले महत्त्वाचे मंत्री आणि मोठ्या प्रमाणावर आमदार घेऊन सेनेतून वेगळे झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत सरकारही स्थापन केले. यात त्यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावाही केला आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या चिन्हावरही हक्क सांगितला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात असतानाच आता शिंदे गट दसरा मेळावाही घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाने दसरा मेळाव्याची परंपरा कायम राखली आहे. यंदा शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाले आणि पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरणार हे निश्चितच होते. हा मेळावा एकनाथ शिंदे घेणार की उद्धव ठाकरे हाही प्रश्न होताच. मात्र आता हा दसरा मेळावा एकनाथ शिंदेच घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सर्व आमदारांना सूचना जारी
एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाजी पार्कवरच हा दसरा मेळावा घेता यावा यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार असल्याचे आता जवळपास निश्चित होऊ लागले आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी याबद्दल सर्व आमदारांना सूचनाही दिल्या आहेत.

भाजपही सहभागी होणार
यंदाच्या मेळाव्यामध्ये भाजपही सहभागी होण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतून नाराज होऊन बाहेर पडलेले आणि आता भाजपामध्ये असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणेही या मेळाव्याला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदाचा मेळावा ख-या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या