23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रदसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच

दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवतिर्थावर दसरा मेळावा घेण्याबाबत सुरु असलेल्या वादासंदर्भात आज कोर्टात सुनावणी संपली. दरम्यान शिवाजी पार्कसाठी शिंदे गटानेही हायकोर्टाचे दार ठोठावले होते मात्र तिन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर शिंदे गटाती याचिका उच्च न्यायलयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर शिंदे गटाला दसरा मेळावा घेता येणार नसून नियमानुसार दसरा मेळावा घेण्याचा प्राथमिक अधिकार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

शिंदे गटातर्फे शिवाजी पार्कसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आपला शिंदे गट हीच आपली शिवसेना आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांकडे अशा प्रकारची परवानगी मागण्याचा कोणता अधिकार नाही. दरवर्षी शिवसेनेकडून सदा सरवणकर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मागत असतात. त्यामुळे त्यांचा अर्ज हा याचिकाकर्त्यांच्या आधी महानगरपालिकेकडे गेला होता..

शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, देसाई यांच्याकडे शिवसेनेचे कोणतेही पद नाही. त्यामुळे त्यांच्याकडे शिवसेनेसाठी परवानगी मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आपला शिंदे गट आहे हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी परवानगी शिंदे गटाला दिली पाहिजे असे शिंदे गटाच्या याचिकेत म्हटले होते मात्र ही मागणी न्यायालयाने फेटाळली असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी मिळाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या