24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रअंबाबाईच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या ई-पासची सक्ती नाही

अंबाबाईच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या ई-पासची सक्ती नाही

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. दहिहंडी, गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे. नवरात्र उत्सवात कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भक्तांना कोणतेही निर्बंध नसणार आहेत. यंदाचा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात पार पडणार आहे.यंदा दर्शनासाठी येणा-या भाविकांना ई-पासची आवश्यकता नाही. ई-पासची सक्ती उठवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांत राज्यावर कोरोनाचे संकट असल्यामुळे निर्बंध घालण्यात आले होते. निर्बंधांचा परिणाम नवरात्र उत्सवावर मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

दोन वर्षांनंतर प्रथमच दहिहंडी, गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरे झाल्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. आता दहिहंडी, गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात पार पडणार आहे. कोरोना काळात भक्तांना ई-पासची सक्ती करण्यात आली होती. यावर्षी मंदिर प्रशासनाकडून ई-पासबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा दर्शनासाठी येणा-या भाविकांना ई-पासची आवश्यकता नाही. ई-पासची सक्ती उठवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

राज्यात दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रोत्सवात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. गेली दोन वर्षे राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने या गर्दीला पूर्णविराम लागला होता. यंदा कोरोनाची लाट ओसरल्यामुळे भाविक दर्शनाला गर्दी करण्याची शक्यता असल्यामुळे भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या