नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता ४.६ इतकी रिश्टर स्केलवर नोंदवली गेली. भूकंपाचे केंद्र दिल्लीपासून ६५ किलोमीटर दूर असलेल्या हरयाणातील रोहतकमध्ये आढळून आले. भूपृष्टापासून ३.३ किलोमीटर अंतरावर हे केंद्र होते.
रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचे हादरे हरयाणा आणि पंजाबमध्येही जाणवले. भूकंपाचे हादरे बसल्यानंतर नागरिक भीतीने घराबाहेर पडले होते.
Read More वुहानमधील ‘तो’ बाजार पुन्हा सुरु झाला!
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकदा दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या वेळी भूकंपाचे केंद्र हे दिल्लीतच होते. दिल्लीला कालही भूकंपाचा धक्का बसला होता. २.५ रिश्टर स्केल इतक्या सौम्य तीव्रतेचा हा भूकंप होता. या आधी दिल्लीत १५ मे रोजी भूकंप झाला होता. त्याची तीव्रताही २.२ रिश्टर स्केल इतकी होती.
त्यापूर्वी १० मे रोजी भूकंप झाला होता. त्याची तीव्रता ही ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. याचे केंद्र दिल्लीतच भूपृष्टभागापासून ५ किलोमीटर अंतरावर होते. त्याच्याही आधी ३ मे रोजी, १३ एप्रिल आणि १२ एप्रिलला दिल्ली-एनसीआर परिसर भूकंपाने हादरला.