28.9 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeराष्ट्रीयपाकमध्ये भूकंप, ९ ठार

पाकमध्ये भूकंप, ९ ठार

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून जगभरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. टर्की, चीन, नेपाळ, ताजिकिस्ताननंतर आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून या घटनेत पाकिस्तानातील ९ जणांचा मृत्यू झाला, तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्येही काही दिवसांपूर्वीच भूकंपाचा धक्का बसला होता.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदूकुश क्षेत्रात ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूंकपाचे झटके पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वासह उत्तर भारतातही जाणवले. या भूंकपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या जुर्म भागात होते. या भूकंपात राजधानी दिल्लीसह उत्तर भारतही हादरला होता. दरम्यान, या घटनेत पाकिस्तानातील ९ नागरिकांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते बिलाल फैझी यांनी दिली.

दिल्ली पुन्हा हादरली
दिल्लीत मागील २४ तासांत दुस-यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. बुधवारी दुपारी ४.४२ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दिल्लीत २.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. या अगोदर मंगळवारी रात्रीही दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. काल रात्री १०.१७ वाजता हा भूकंप झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या