26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रकोयना परिसरात भूकंपाचे धक्के

कोयना परिसरात भूकंपाचे धक्के

एकमत ऑनलाईन

पाटण : कोयना धरण परिसराला आज दुपारी एक वाजता भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता ३.० रिस्टर स्केल नोंदवली गेली आहे. धरणाच्या भूकंप मापक केंद्रात त्याची नोंद झाली आहे. धक्का सौम्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे कोणतीही जीवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे.

दरम्यान, भूकंपाचा केंद्रबिंदू सध्या समजू शकला नाही. या भूकंपाची नोंद (३.०) रिश्टर स्केल इतकी झालेली आहे. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाणा पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे १०, नवजाला ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात ६१.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात ६,३४३ क्यूसेक पाण्याची आवक होत असून धरणातून २१०० पाण्याचा विसर्ग सुरू आहे

सध्या पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यातच आज दुपारी १ च्या सुमारास अचानक कोयना धरण परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. मात्र पिरसरातील नागरिकांना घाबरण्याचे काहीही कारण नाही अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या