मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असून, मुंबईतील ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. दरम्यान, त्यात अनेक रस्ते मार्गांसाठी मोठ्या निधीची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली होती.
अस्लम शेख यांची मागणी मान्य करत दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव आता ईस्टर्न फ्री वेला दिले जाणार आहे. मुंबईची वाहतूक कोंडी लक्षात घेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणा-या पूर्ण मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा मार्ग तयार होऊ शकला, त्यामुळे या मार्गाला आता विलासरावांचे नाव दिले जाणार आहे.
ईस्टर्न फ्री वे ची वैशिष्टये
> दक्षिण मुंबईतून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाण्यासाठी ईस्टर्न फ्री वे महत्वाचा आहे.
> या फ्री वेची लांबी १६.८ किलोमीटर आहे.
> दक्षिण मुंबईतील पी डीमोलो रोडपासून ते चेंबूर इथल्या पूर्व द्रुतगती मार्गाला हा जोडला जातो़
> हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे.
इंधन, गॅस दरवाढीवर राज्यसभेत गोंधळ