23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयसोनिया गांधींची ईडी चौकशी संपली

सोनिया गांधींची ईडी चौकशी संपली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी करण्यात आली.

साधारण १२ वाजता सोनिया गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाल्या. जवळपास अडीच तास त्यांची ईडी चौकशी चालली. या चौकशी दरम्यान प्रियंका गांधीही सोनिया यांच्यासोबत ईडी कार्यालयात हजर होत्या. सोनिया गांधी यांच्या घशाला त्रास होत असल्याने त्या ईडीच्या प्रश्नांना लेखी उत्तरे दिल्याची माहिती मिळतेय. मागच्या महिन्यात राहुल गांधी यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यांची सलग तीन दिवस अनेक तास चौकशी करण्यात आली होती.

त्यामुळे सोनिया गांधी यांची किती तास चौकशी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. सोनिया गांधी या ईडीच्या चौकशीला सामोरे गेल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशभरात जोरदार आंदोलने करणात आली. मोदी हाय, मोदी हायच्या घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस आल्यानंतर गेल्या आठवड्यातनच काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना देशभर आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्रासह देशभर आज जोरदार आंदोलने करण्यात आली. राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार आंदोलन करण्यात आले.

मुंबईत काँग्रेसचे भाई जगताप, सोलापुरात प्रणिती शिंदे, साता-यात पृथ्वीराज चव्हाण, अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले गेले. नागपूर, ठाणे, भिवंडीसह राज्यातील अनेक भागातही आंदोलने झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या