नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीला हजार राहण्यासाठी सोनिया गांधींनी अधिक वेळ मागितला होता. आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया यांना नवीन समन्स बजावले आहे.
सोनिया गांधी यांना २१ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात हजर होण्याची नवीन नोटीस ईडीने बजावली आहे. या प्रकरणात सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी यांची याआधी अनेकदा चौकशी केली आहे. मागील काही दिवसांपासून सोनिया गांधी आजारी होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून घेतली होती. आता ईडीने नवीन नोटीस बजावली आहे.