22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत यांना ईडीचे समन्स

संजय राऊत यांना ईडीचे समन्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील राजकीय पेच सुटण्याची काही चिन्हं दिसेनात. राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच आता राज्यात खळबळ माजवणारी बातमी हाती आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे संजय राऊतांना आदेश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भातील कोणतीही नोटीस ईडीकडून अद्याप मिळालेली नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

अद्याप ईडीकडून नोटीस मिळालेली नाही : संजय राऊत
आपल्याला अजून ईडीकडून नोटीस मिळालेली नाही, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान उद्या संजय राऊत यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे ते उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता कमीच आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ते ईडीकडे मुदत मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या