22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचा समन्स

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचा समन्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असताना संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील मनी लॉड्रिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आले आहे.

पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत, आज संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे, यादरम्याना पत्रा चाळ जमीन प्रकरणातील मनी लॉड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने आज समन्स बजावला आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यावर काही व्यवहार उघडकीस आल्यानंतर ईडीने त्यांच्या नावे समन्स जारी केले आहे.

दरम्यान संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली असून त्यांना पुन्हा ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या