29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी प्रयत्न - पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी प्रयत्न – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याला गड-किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी पर्यटनविषयक प्रसिध्दी मोहीम, पर्यटनाबाबत सामंजस्य करार, पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणा-या पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, गायक शंकर महादेवन व अमृता फडणवीस यांनी गायिलेल्या महाराष्ट्र पर्यटन गीताचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांसह पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील ७५ व्हीडीओ लाँच
मुंबई व्हीडीओ मालिका प्रकल्पामध्ये लोकप्रिय आणि पर्यटकांच्या आकर्षणाच्या ठिकाणांभोवती हे चित्रित करण्यात आले आहेत. मुंबईतील २०० पर्यटन स्थळांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र पर्यटनाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर याचे व्हीडीओ साप्ताहिक पोस्ट केले जातील.

अनलिमिटेड महाराष्ट्र पॉडकास्टसह ‘कानोदेखी’ लाँच
पॉडकास्ट हे पर्यटनाला चालना देणारे सर्वांत महत्त्वाचे माध्यम म्हणून ओळखले जाते. पर्यटनाचा कायापालट करण्याचा एक भाग म्हणून, ‘अनलिमिटेड महाराष्ट्रासह कानोदेखी’ ही मालिका रेडिओ सिटी ९१.१ एफएमवर साप्ताहिक ६ महिन्यांसाठी प्रसारित केली जाईल, ज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भाग दाखवले जाणार आहेत.

टीव्ही मोहिमेचा शुभारंभ
महाराष्ट्रातील विशिष्ट पर्यटनस्थळे आणि अनुभवांना प्रोत्साहन देण्यासाठी, पर्यटन विभागाने महाराष्ट्र पर्यटनाच्या चांगल्या जाहिराती आणि प्रसिद्धी एकत्रित करण्यासाठी ४ दूरचित्रवाणी मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत.
३६० व्हीडीओ, पॉडकास्ट आणि ब्लॉग लाँच

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवान आणि टेक्नो-सॅव्ही जगाच्या बरोबरीने राहण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र पर्यटन महाराष्ट्रातील सर्व ६ युनेस्को हेरिटेज साईट्सचे ३६० डिग्री व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी व्हीडीओ, पॉडकास्ट आणि ब्लॉग तयार करत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले तर आभार मिलिंद बोरीकर यांनी मानले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

***

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या