27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ईद साजरी

लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ईद साजरी

एकमत ऑनलाईन

ऐ अल्लाह कोरोनापासून समस्त मानवांचे रक्षण कर
लातूर :
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे़ ऐ अल्लाह तूच सर्वस्वी आहे़ आज संपूर्ण मानवजात कोरोनाच्या कवेत आहे़ अनेकांचे जीव गेले, कित्येक जण कोरोनाच्या सावटाखाली आहेत़ या महामारीने तुझ्या घराचे दरवाजेही बंद झाले आहेत त्यामुळे आम्ही आमच्या घरुनच तुझ्याकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह कोरोना महामारीपासून समस्त मानव जातीचे रक्षण कर, अशी प्रार्थना ईद-उल-फित्रनिमित्त मुस्लिम बांधवांनी केली़ लॉकडाऊन व संचारबंदीमुळे कोणीच घराबाहेर पडले नाही. कोरोनाचे संकट आपल्या देशावर असल्यामुळे दि़ २५ मे रोजी यंदाची ईद अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.

यंदाचा संपूर्ण रमजानचा महिना कोरोनाच्या सावटाखाली गेला़ रमजान
सुरू होण्यापूर्वीपासूनच मस्जिद बंद करण्यात आली़ सर्वच धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत़ रमजान महिन्यात मुस्लिम बांधव एरव्हीपेक्षा जास्त नमाज, प्रार्थना, कुरआन शरिफचे पठण करीत असतात त्यामुळे संपूर्ण महिनाभर मस्जिदांमधून गर्दी असते़ यंदा मात्र मस्जिद बंद असल्यामुळे मुस्लिमांनी आपापल्या घरांनाच ईबादतगाह बनविले होते़
पाच वेळेची नमाज, तरावीह, इतर प्रार्थना आपापल्या घरीच झाली़ ईद-उल-फित्रची नमाजही घरोघरीच झाली़ दरवर्षीसारखा माहोल यंदा नव्हता त्यामुळे मुस्लिम बांधवांनी सकाळी आपापल्या घरी ईद-उल-फित्रच्या नमाजची तयारी केली आणि नमाज अदा केली़ नमाज झाल्यानंतर मात्र प्रत्येकांनी अल्लाकडे एकच मागणी केली ती म्हणजे कोरोनापासून मानव जातीचे रक्षण कर. एरवी रमजान ईद म्हणजे उत्साह, आनंदाचा मोठा सण; परंतु, यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे तो उत्साह, आनंद दिसलाच नाही़ मुळात सर्वच जण संचारबंदी व लॉकडाऊनमुळे अडचणीत आले़ आर्थिक अडचणीला सामोरे जात असताना वाढत्या महागाईचाही फटका बसला. यामुळे वेळापत्रकानुसार बाजारपेठे उघडी असली तरी ईदची खरेदी मात्र दरवर्षीप्रमाणे झाली नाही. ईदसाठी अगदीच आवश्यक साहित्यांची खरेदी आणि जुळवाजुळव करण्यात आली होती़ लॉकडाऊन आणि संचारबंदी त्यात फिजिकल डिस्टन्स पाळणे आवश्यक असल्याने सर्वच गोष्टी मोजून मापून झाल्या त्यामुळे घरच्या घरी अत्यंत साधेपणाने ईद साजरी झाली़ ईद असतानाही शहरात
शुकशुकाट होता.


कोरोनापासून रक्षण करण्याची ‘अल्लाह’कडे प्रार्थना
चाकूर : टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यातही कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत नसल्यामुळे रमजान ईदची नमाज ही घरातच करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. यास प्रतिसाद देत मुस्लीम बांधवांना शारीरिक अंतर ठेवत घरीच रमजानची नमाज पठण केली .मौलाना गुलाम रसुल, सय्यद इसा मौलाना, सय्यद हुसेन मौलाना, उमर मौलाना, मतीनभाई यांच्यासह सर्व मुस्लिम बांधवांनी कोरोना महामारीपासून रक्षण करावे अशी दुआ अल्लाहाकडे केली.
मुस्लीम बांधवांनी रमजान ईदनिमीत्त सोमवारी सकाळी घरात राहूनच नमाज पठण केले मुस्लीम समाजात पवित्र समजल्या जाणा-या रमजान महिन्याची सुरुवातच कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये झाली. यामुळे सुरवातीपासून मुस्लीम बांधवांना मशिदीमध्ये न जाता घरातच नमाज पठण करण्यास सुरवात केली होती.

मुस्लीम बांधवांना आमदार बाबासाहेब पाटील, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, गटविकास अधिकारी लोखंडे, पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, नगराध्यक्षा सौ.रुपाली सिध्देश्वर पवार, उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, पंचायत समितीचे माजी सभापती करीमसाब गुळवे, माजी कृऊबा सभापती राधाकिशन तेंलग, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, सिनेट सदस्य अ‍ॅड. युवराज पाटील, माजी उपसरपंच मुर्तजा सय्यद, नगरसेवक इलियास सय्यद, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन करीम डोंगरे, भाजपचे सुरेश हाके पाटील, नगरसेवक चाँदसाब मासुलदार, मजदुर युनियनचे जिल्हा अध्यक्ष पप्पू शेख, साजीद लखनगावे,रिजाझ पठाण, सलीम तांबोळी, इसुब शेख, ईलियास शेख आदींनी शुभेच्छा दिल्या

Read More  ‘आयसीसी’ची मार्गदर्शक तत्त्वे हंगामी!

नवीन कपडे, शिरखुर्माविना रमजान ईद साजरी
शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
या अल्लाह इस कोरोना बिमारी का खात्मा कर दे सबको इस बिमारी से निजÞात अता फरमÞा.सारे मुल्कमे अमन और सूकुन अता फरमा.भारत देश को अखंड रखते हुए भाईचारा बनाए रखना, अशी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली़ पवित्र समजल्या जाणाºया रमज़ानमधील महिन्याभराच्या रोज़ा नंतर ईद-ऊल-फित्रची नमाज अदा करुन कोरोना वायरस कोविड १९ च्या सावटा खाली पहिल्यांदाच रमजान ईद घरीच साजरी करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी मशीद व ईदगाहमध्ये शुकशुकाट दिसून आला़ रमजानपर्व काळात सर्व मुस्लीम समाज बांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलिस प्रशासनाला सहकार्य करीत घरी ईद साजरी करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानले गेलेल्या रमजान पर्वास यंदा कोरोनाच्या लॉक डाऊनमध्ये सुरुवात झाली. गेल्या वर्षी मोठ्या उत्साहात रमजानचा महिना संपला. यावर्षी रमजानवर कोरोनाचे सावट सावट दिसून आले़ सोशल डिंस्टंिसग पाळणे गरजेचे असल्याने मशिदीत नमाज पठण न करता दिवसभरातील सर्व नमाज घरातच अदा केली. कोरोना आजाराच्या संकटामुळे संपुर्ण रमजान महिना यावर्षी जेमतेम उत्साहात पार पडला.कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन’ घोषित केले गेले. या पार्श्वभूमीवर धर्मगुरुनीही या वर्षी रमजान ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करून कोरोना संकटात सापडलेल्या लोकांना जमेल तेवढी मदत करा व बाजारातून काही ही खरेदी करण्यासाठी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार शहरासह तालुक्यातील सर्व गावांत मुस्लीम बांधवांनी धर्मगुरू व उलेमांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळी घरी नमाज पठण करून रमजान ईद अगदी साधेपणाने साजरी केली, प्रत्येक ईदला अत्यंत मशीद व ईदगाह गजबून जायचा मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे मशीद व ईदगाह मध्ये शुकशुकाट दिसून आला.

Read More  पालकमंत्री चव्हाण उपचारांसाठी अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

‘महामारी’ से बचा और उसे खतम फर्मा
औसा
: औसा तालुक्यासह शहरात प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात येणारी ईद-उल-फित्र (रमजान ईद) यावर्षी कोरोनामुळे साधेपणाने साजरी करण्यात आली. महिनाभरापासून सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या उपवासानंतर (रोजे) चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद-उल-फित्र (रमजान ईद) साजरी करण्याची चाहूल लागली होती. आज शहर व तालुक्यात मुस्लिम बांधवानी आपापल्या घरीच ईदची नमाज अदा केली .कोरोना महामारीसे बचा, और उसे खतम फर्मा अशी प्रार्थना शहर काझी मिर मुजम्मीलअली यांनी करीत मानवजातीच्या कल्याणासाठी व जगातील सर्व संकटावर मात करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली, गोरगरीब, बेघर गरजूं कामगारांसाठी व शेतकरी, शेतमजूरसह, सर्व मानवजात संकटात आहे, त्यांच्यासाठी व पावसासाठी प्रार्थना तसेच महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी दिवस – रात्र मेहनत घेणारे पोलीस प्रशासन व आरोग्य अधिकारी तसेच डॉक्टरांना पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सफाई कामगार, सामाजिक संस्था, सामाजिक संघटना,सह या कोरोनाच्या योध्दात जे आज लढा देत आहेत त्यांना अल्लाह बळ देवो अशी प्रार्थना करण्यात आली.

कोरोना व्हायरस विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेळीच खबरदारी घेत, संचारबंदी व लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत ईद-उल-फित्रची (रमजान ईद) नमाज पठण घरीच करा असे आवाहन औसा शहराचे शहर काझी मिर मुजम्मील अली यांनी दिले होते. तालुक्यासह शहरातील मुस्लिम बांधवांनी कोरोना महामारीच्या संकटावर मात करून मानवतेच्या सेवेत सहभागी होऊन प्रशासनाने जारी केलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत, सोशल डिस्टन्सचे अंतर ठेवून मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फत्रिची (रमजान ईद) नमाज घरीच पठन केले आहे. तालुक्यासह शहरात प्रशासनाच्या आदेशाचे सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य केले आहे. सार्वत्रिक साजरी होणारी ईद-उल-फित्रची (रमजान ईद) नमाज ही ईदगाह मैदानावर व मशिदीमध्ये न होता ती सर्वांनी आपापल्या घरात ईद ची नमाज अदा केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या