24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रलातूर, औरंगाबादसह राज्यात चार शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साडे आठशे नवीन पदांना...

लातूर, औरंगाबादसह राज्यात चार शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साडे आठशे नवीन पदांना मान्यता !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२(प्रतिनिधी) प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत राज्यातील अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी पहिल्या टप्प्यात ८८८ पदांची निर्मिती देखील करण्यात येणार आहे.

या प्रत्येक महाविद्यालयासाठी केंद्र शासन १२० कोटी रुपये तर राज्य शासन ३० कोटी रुपये अर्थसहाय्य करणार आहे. सध्या औरंगाबाद येथील बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले असून यवतमाळ येथील बांधकामही जवळपास पूर्ण झाले आहे. लातूर आणि अकोला येथील महाविद्यालयाच्या इमारती पूर्ण झाल्या असून कोविड उपचारासाठी त्या वापरात आहे. या नव्याने सुरु होणाऱ्या अतिविशेषोपचार रुग्णालयांमध्ये हृदयरोगचिकित्सा, उर शल्यचिकित्सा, मुत्र पिंडचिकित्सा, मुत्र रोगशल्यचिकित्सा, मज्जातंतु शल्यचिकित्सा, नवजात शिशु अतिदक्षता विभाग इत्यादी सेवा असतील.

एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या