फतेहपूर : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात मंगळवारी एक भीषण रस्ता अपघातात ऑटोमधील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तर दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. जहानाबादमधील मिरची मोडजवळ ही घटना घडली. घटनेनंतर घटनास्थळी राडा झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ऑटोमध्ये १४ जण असल्याचे सांगण्यात येत आहे.