24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत ओला चालकाची आठ जणांना धडक

मुंबईत ओला चालकाची आठ जणांना धडक

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईच्या घाटकोपर भागातून एक खूप मोठी बातमी समोर आली आहे. घाटकोपरमध्ये एका ओला चालकाने तब्बल आठ जणांना जोराची धडक देऊन उडवले आहे. घाटकोपरच्या सुधा पार्क परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना या ओला चालकाने धडक दिली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ओला चालक गाडी नेमकी कशी चालवत होता, तो नशेत होता की गाडीत तांत्रिक बिघाड झाला, त्याचा गाडीवरचा ताबा सुटला की आणखी काही वेगळं कारण होतं? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे.

दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने मुंबईतील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या