22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागील १० दिवसांपासून सुरू असलेला राजकीय गोंधळ अखेर संपला आहे, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येते शिवसैनिकांच्या उपस्थितीत शपथ घेतली. काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. पहिल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आतच एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली.

यादरम्यान उपमुख्यमंत्री पदी भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होणार नाही माझा सरकरला बाहेरून पाठिंबा देईल असे सांगितले होते. मात्र केंद्रीय नेत्यांकडून फडणवीसांनी सरकरमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं असं सांगितल्यानंतर अखेर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी अशी इच्छा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आहे. त्यानुसार आता फडणवीस राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्याचा आग्रह केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे फडणवीसांनी मोठे मन दाखवत मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगत आपण बाहेर राहून सरकारला साथ देणार असल्याचे सांगितले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या