मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसतंय. शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहतात की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय.
राज्यातल्या गोंधळानंतर काँग्रेस हायकमांड सक्रीय
काँग्रेसकडून महाराष्ट्रातल्या ताज्या राजकीय स्थितीवर निरीक्षक म्हणून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.