24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्र‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचे एकनाथ शिंदेंचे प्रयत्न

‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचे एकनाथ शिंदेंचे प्रयत्न

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर येत आहे.

‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदेंचे प्रयत्न आहेत, अशी माहिती आहे. यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याची देखील माहिती आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्र सादर केल्यानंतर शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील अशी माहिती मिळतेय.

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितलं की, विधिमंडळात पक्षात फूट पडण्यासाठी दोन तृतीअंश आमदार त्या गटाकडे असणं आवश्यक असतं. तसं मूळ पक्षावर दावा करण्यासाठी त्यांच्या पॅरेन्ट्स पार्टीमध्ये फुट पडायला हवी.

यामध्ये ऑफिस बेरर, पक्षाचे प्रतिनिधी, लोक प्रतिनिधी यामध्ये फुट झाली असेल तर त्या पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह तुम्हाला मिळू शकते. यामध्ये रवी नायक केसमध्ये सुप्रीम कोटाने बाबी स्पष्ट केल्या आहेत. फक्त विधिमंडळ पक्षात नाही तर मूळ पक्षात फुट पडायला हवी तरच पक्षाच्या अधिकृत नावावर आणि चिन्हावर दावा करता येऊ शकतो.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या