25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंच्या ‘पीए’ची शिवसेना नेत्यास धमकी

एकनाथ शिंदेंच्या ‘पीए’ची शिवसेना नेत्यास धमकी

एकमत ऑनलाईन

जळगाव : राज्यात सत्तांतराचे घमासान सुरू असतानाच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी स्वीय सहाय्यकावर (पीए) गंभीर आरोप झाले आहेत.

‘‘बंडखोर आमदारांना विरोध का करता? विरोध करणं बंद करा, अन्यथा जिवे  मारू,’’ अशी धमकी एकनाथ शिंदे यांच्या पीएने दिल्याचा आरोप जळगाव शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. जळगाव शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात शनिवारी (२ जुलै) मोर्चा काढला. यावेळी सभेदरम्यानच हा फोन आल्याचे गुलाबराव पाटलांनी सांगितले.

जळगावमध्ये बंडखोर आमदारांविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी गुलाबराव वाघ यांना एक फोन आला. ‘‘फोनवर बोलणा-याने मी एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत आहे असे सांगितले. आमदारांना विरोध का करता? असा सवाल करत त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली,’’ असा आरोप गुलाबराव वाघ यांनी केला. विशेष म्हणजे हा फोन सभेदरम्यानच आला होता. वाघ यांनी ज्या फोनवरून धमकी आली तो नंबरही माध्यमांना दाखवला.

धमकीविरोधात पोलिस तक्रार करणार
धमकीच्या फोनवर प्रतिक्रिया देताना गुलाबराव वाघ यांनी आपण अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. बंडखोरांविरोधात शिवसैनिक एकवटला आहे. शिवसैनिकांची एकजूट अशीच राहील.

आम्ही यापुढेही बंडखोरांचा विरोध करू.’’ शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शिवसैनिकांना हात जरी लागला तर जशास तसे उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव वाघ यांनी धमकीच्या फोनची माहिती देतानाच याविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या