21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्र‘मातोश्री’वरून बोलावले तर एकनाथ शिंदेंसह जाणार ; बंडखोर आमदार सुहास कांदे

‘मातोश्री’वरून बोलावले तर एकनाथ शिंदेंसह जाणार ; बंडखोर आमदार सुहास कांदे

एकमत ऑनलाईन

शिर्डी : शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले आहे. पण अजूनही शिवसेनेच्या बंडखोरांना मातोश्रीकडून बोलावण्यात यावं अशी इच्छा आह. ‘आमची इच्छा आहे, आम्हाला फोन यावा आणि मातोश्रीवर आम्हाला बोलवावं, मात्र मुख्यमंत्री शिंदे यांना बोलवलं तरच सर्वजण सोबत जावू, एकटा जाणार नाही’ असं वक्तव्य नांदगाव मतदारसंघाचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केलं आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वच बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. आमदार सुहास कांदे देखील आपल्या नांदगाव मतदारसंघात परतले.

त्यानंतर कांदे हे सपत्निक साईबाबा मंदिरात दर्शनासाठी शिर्डीत आले होते. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आपण साईबाबांना नवस केला होता आणि तो फेडण्यासाठी शिर्डीत बाबांच्या दरबारी आल्याचं सुहास कांदे यांनी साई दर्शनानंतर सांगितलं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या