31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeराष्ट्रीयपाळीव कुत्र्यावर वृद्धाचा अत्याचार

पाळीव कुत्र्यावर वृद्धाचा अत्याचार

एकमत ऑनलाईन

सोनारपूर : आपल्याच पाळीव कुत्र्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका ६० वर्षांच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कोलकाता येथील सोनारपूरमधल्या चौहाती पायराबगन भागामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याबद्दल माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी रतिकांत सरदार या व्यक्तीला गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केली. शेजा-यांनी या घटनेचा व्हीडीओ शूट केला, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. स्थानिकांना रतिकांत विवस्त्र अवस्थेत आढळला. तो कुत्र्यावर बलात्कार करत होता आणि कुत्रा आरडाओरडा करत होता.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रतिकांत आपल्या पाळीव कुत्र्यावर दोन वर्षांपासून अत्याचार करत होता. अनेकांनी सातत्याने रतिकांतला समजावले, कुत्र्याला सोडून द्यायला सांगितले. पण त्याने कोणाचेच काही ऐकले नाही. त्यानंतर सातत्याने रतिकांत हा प्रकार करत राहिला.

त्यानंतर अखेर रतिकांत त्या कुत्र्यावर बलात्कार करत असतानाचा एक व्हीडीओ शेजारच्या लोकांनी शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हीडीओ व्हायरल झाला. एका प्राणीमित्र संघटनेच्या सदस्याने हा व्हीडीओ पाहिला आणि त्याने सोनारपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या