22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक सर्वांधिक असुरक्षित

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक सर्वांधिक असुरक्षित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक सर्वात कमी सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती एनसीआरबी(नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) अहवालातून समोर आली आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्रात ६१९० ज्येष्ठ नागरिकांसंबधित गुन्ह्याची नोंद झाली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार देशातील ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रात सर्वात कमी सुरक्षित आहेत, त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर असून महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेश तिस-या क्रमांकावर आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर होणा-या अत्याचारात गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर मध्यप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो. २०२० मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीचा आलेख ढासळला होता. पण कोरोनानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर होणा-या आत्याचारात वाढ झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमाण सर्वाधिक आहे.

आघाडीवर असणारे चार राज्य
राज्याचे नाव २०१९ २०२० २०२१
महाराष्ट्र ६१६३ ४९०९ ६१९०
मध्य प्रदेश ४१८४ ४६०२ ५२७३
तेलंगणा १५२३ १५७५ १९५२
तामिळनाडू २५०९ १५८१ १८४१

मध्य प्रदेशात सर्वांधिक बलात्काराच्या घटना
मध्य प्रदेशात ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, असे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांविरोधातील ६,१९० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

बहुतांश घटनांमध्ये आरोपींना बेड्या
महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर या यादीत मध्य प्रदेश दुस-या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये मध्य प्रदेशमध्ये ५२७३ गुन्हे घडले ज्यात पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजेच मध्य प्रदेशात दररोज १४ वृद्ध गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. तेलंगणामध्ये २०२१ मध्ये १९५२ प्रकरणांसह तिस-या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये २०२१ मध्ये १८४१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. दरम्यान, या बहुतांश घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

ज्येष्ठांच्या हत्येत तामिळनाडू अग्रस्थानी
ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर असून महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेश तिस-या क्रमांकावर आहे. तामिळनाडूमध्ये १९१, महाराष्ट्रात १८१, मध्य प्रदेशमध्ये १२१ आणि उत्तर प्रदेशमध्ये १०१ ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येची नोंद झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या