27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रसभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड

सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधान परिषद सभागृह नेता म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदेंच्या बंडानंतर राज्यतील मविआ सरकार कोसळले. तत्कालीन सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा आमदार तसेच सभापतिपदाचा कालावधी संपला होता.

दरम्यान, विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपकडून राम शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, उपसभापती नीलम गो-हे यांनी विधानपरिषद सभापतीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली.

विधानपरिषदेत वर्चस्वासाठी सभागृहाच्या सभापतिपदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, असा भाजपचा मनसुबा आहे. सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतिपद मिळविण्याची भाजपची रणनीती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या