24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील २७१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील २७१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. आयोगानं याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) मधील कलम १० अ पोटकलम (४) मधील अधिकारांचा वापर करत राज्य निवडणूक आयोगानं २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत.

पाच जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. चार ऑगस्ट रोजी मतदान, तर पाच ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढील महिना या ग्रामपंचायत हद्दीत रणधुमाळी गाजणार आहे. राज्यात २८,८१३ ग्रामपंयायती आहेत.

निवडणुका असलेल्या ग्रामपंयचायतीमध्ये, निवडणूक क्रायक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहिल, असे जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगानं जिल्हाधिका-यांना सांगितले आहे.

सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.या निवडणुकीदरम्यान कोरोना नियमांचं पालन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.

कसा आहे निवडणूक कार्यक्रम –
तहसिलदार यांनी विडणुकीचू नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक – ५ जुलै २०२२ (मंगळवार ).
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – १२ जुलै १९ जुलै पर्यंत… वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.

नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक -२० जुलै , नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक – २२ जुलै , निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदरांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक – २२ जुलै २०२२ (दुपारी तीन नंतर). असल्यास मतदानाचा दिनाक -४ ऑगस्ट २०२२. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक ५ ऑगस्ट २०२२.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या