25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्र९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. ८ जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

त्यामुळे १९ जुलै रोजी कोर्टात होणा-या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता लागू होणार नाही. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परित्रक काढण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका राज्यातील सर्वच नेत्यांनी घेतली होती. यामध्ये सत्ताधा-यांसह विरोधकांचाही समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, पंकजा मुंडे, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका घेतली होती. हे प्रकरण कोर्टात गेलेय.

त्यामुळे आता १९ तारखेनंतरच पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड , उस्मानाबाद, लातूर , अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.

निवडणूक आयोगानं परिपत्रकात काय म्हटलेय?
राज्य निवडणूक आयागाचे दि. ८ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगर पंचायतींच्या सदस्या पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ दिला होता.
सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ ची सुनावणी दि. १२ जुलै २०२२ रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागसप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने या संर्भातील पुढील सुनावणी १९ जुलै २०२२ रोजी ठेवलेली आहे.

सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की, आयागाचे ८ जुलै २०२२ रोजीच्या आदेशान्व्ये देण्यात आलेला राज्यातील ९२ नगर परिषदा व चार नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ याद्वारे स्थगित करण्यात येत आहे. सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता लागू होणार नाही.

‘अ’ वर्गातील ६ नगरपरिषदा-
भुसावळ ,बारामती ,बार्शी ,जालना ,बीड ,उस्मानाबाद
ब वर्गातील २८ नगरपरिषदा-
मनमाड,सिन्नर,येवला,दौंडाईचा- वरवाडे,शिरपूर- वरवाडे,शहादा,अंमळनेर,चाळीसगाव,कोपरगाव,संगमनेर,श्रीरामपूर,चाकण,दौंड,कराड,फलटण,इस्लामपूर
विटा,अक्कलकोट,पंढरपूर,अकलूज,जयसिंगपूर,कन्नड,पैठण,अंबेजोगाई,माजलगाव,परळी-वैजनाथ,अहमदपूर,अंजनगाव- सुर्जी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या