26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रबैलगाडीवर विजेची तार कोसळली ; विजेच्या धक्क्याने बैल आणि शेतक-याचा मृत्यू

बैलगाडीवर विजेची तार कोसळली ; विजेच्या धक्क्याने बैल आणि शेतक-याचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

जळगाव : चालत्या बैलगाडीवर वीज तार कोसळून विजेचा धक्का बसून झालेल्या अपघातात बैलासह शेतक-याचा जागेवरच मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील चिखली या गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. आज (१ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

महावितरणच्या कारभारावर रोष
यावल तालुक्यातील चिखली येथे रस्त्यावरून बैलगाडी जात असताना अचानक विजेची तार बैलगाडीवर कोसळली. यावेळी विजेचा धक्का बसून बैलगाडी हाकणा-या शेतक-यासह बैलाचा जागीच मृत्यू झाला. यशवंत कामा महाजन (वय ६५ वर्षे, रा. चिखली बुद्रुक) असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतक-याचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून महावितरण कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांमधून रोष व्यक्­त करण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेला बैल आणि त्यावर शेतक-याचा मृतदेह असे दृश्य बघून यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.

चिखली बुद्रुक येथे यशवंत कामा महाजन हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शेतमजुरी करून ते त्यांचा उदरनिर्वाह भागवत होते. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे बैलगाडी घेऊन शेतात जात होते. या दरम्यान गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यावरून गेलेली विजेची तार अचानकपणे बैलगाडीवर कोसळली.

या घटनेत विजेचा जोरदार धक्का बसून यशवंत महाजन यांचा मृत्यू झाला तर या घटनेत बैलगाडीचा एक बैलही जागीच दगावला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस पाटील भागवत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या