21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeमहाराष्ट्रअकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

एकमत ऑनलाईन

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाची नियमित दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून २३ हजार १२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये दि. ९ डिसेंबरपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुस-या फेरीत सर्वाधिक १० हजार प्रवेश विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवडमधील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

या प्रक्रियेतील पहिली फेरी काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली होती. पण मराठा आरक्षणासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पहिल्या फेरीमध्ये एकुण ३० हजार ५४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दुसºया फेरीत एकुण ६० हजार ५९९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ४६ हजार ७१४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यातून गुणवत्तेनुसार २३ हजार १२० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये १० हजार ८९ विद्यार्थी विज्ञान शाखेतील तर ९ हजार ७६२ विद्यार्थी वाणिज्य शाखेतील आहेत. एकुण अर्जांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार पहिल्या पसंती दिलेल्या ८ हजार ९२९ विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि.९ डिसेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना घेतलेला प्रवेश रद्द व नाकारताही येऊ शकतो. तसेच पुढील प्रवेश फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग १ भरता येईल. प्रवेशाची नियमित तिस-या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जाहीर केली जाणार आहे.

जखमी मुलीचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी २१ किमीचे अंतर १६ मिनटात पार केले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या