26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेत आणीबाणी लागू

श्रीलंकेत आणीबाणी लागू

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात आल्यानंतर देशभरात राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. देशभरात राजपक्षे सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत होते. अखेर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे.

देशातील बिघडत असलेली स्थिती आणि राजकीय अस्थिरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गोतबाया राजपक्षे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मंिहदा राजपक्षे यांना हटवून सर्वपक्षीय काळजीवाहू सरकारची स्थापन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या सरकारमध्ये विरोधी पक्षांना देखील सहभागी करुन घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

राजपक्षेंच्या राजीनाम्याची मागणी
श्रीलंकेतील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी देखील पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पंतप्रधानांचा राजीनामा घेऊन सर्वपक्षीय सरकारची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. दुसरीकडे महिंदा राजपक्षे यांनी त्यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी श्रीलंकन संसदेत उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत राजपक्षे समर्थक उमेदवाराचा विजय झाला. हा विजय राजपक्षे कुटुंबासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

श्रीलंका दिवाळखोरीच्या वाटेवर
श्रीलंकेची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून होती, मात्र कोरोनामुळे पर्यटन बंद झाल्याने आर्थिक झळ बसली आहे. श्रीलंकेने यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे थांबवले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे श्रीलंकेने मदतीची मागणी केली आहे. या वर्षी, आयएमएफकडे श्रीलंकेला कर्जापोटी ७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम जमा करायची आहे. तर २०२६ पर्यंत २५ अब्ज डॉलर्स जमा करायचे आहेत. मात्र, श्रीलंकेकडे केवळ एक अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके परकीय चलन शिल्लक आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या