Saturday, September 23, 2023

उत्साहवर्धक : डॉ. वर्मा : स्वदेशी लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण

मुंबई : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोनावर लस नेमकी कधी येणार, याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. त्यातच स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या चाचणीचे निष्कर्ष अपेक्षेनुसार आहेत.

हरियाणातील रोहतकमधील मेडिकल सायन्सेस पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमध्ये काल कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती चाचणी घेणाºया वैद्यकीय पथकाच्या प्रमुख डॉ. सविता वर्मा यांनी दिली. पहिल्या टप्प्याच्या दुस-या भागात ६ जणांना लस देण्यात आली. लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण भारतात ५० जणांना लस टोचण्यात आली. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत, असेदेखील डॉ. वर्मा यांनी सांगितले.

कोरोनावरील कोव्हॅक्सिन लसीच्या पहिल्या मानवी चाचणीला १७ जुलैपासून सुरुवात झाली. त्या दिवशी पीजीआय रोहतकमध्ये तीन जणांना लस देण्यात आली. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. त्यामुळे भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कोव्हॅक्सिनसोबतच आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोनावरील लसीचीही मानवी चाचणी सुरू आहे. त्या चाचणीचे परिणामदेखील उत्साहवर्धक आहेत. लसीमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढत असून, अ‍ँटीबॉडीज तयार होत असल्याची माहिती संशोधकांनी दिली.

Read More  ११ वी, १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी फेसबूकवरुन लाईव्ह मार्गदर्शन

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या